भाजप नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या हस्ते वीरा देसाई रोडवर ‘EV Bike Rental and Sales’ उपक्रमाचे उद्घाटन; स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी
तरुणांनी रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे होण्याकडे भर द्यावा -=रुपेश सावरकर (भाजप नगरसेवक)

भाजप नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या हस्ते वीरा देसाई रोडवर ‘EV Bike Rental and Sales’ उपक्रमाचे उद्घाटन; स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी

मुंबई : प्रभाग क्र. ६३, वीरा देसाई रोड येथे पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतुकीला चालना देणाऱ्या ‘EV Bike Rental and Sales’ या उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन सावरकर फोाऊंडेशनचे अध्यक्ष रुपेश सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम स्थानिक नागरिक तसेच डिलिव्हरी पार्टनर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. ईव्ही बाईक रेंटल आणि विक्रीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

वीरा देसाई रोड परिसरात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे दैनंदिन प्रवास तसेच डिलिव्हरी क्षेत्रातील काम करणाऱ्या नागरिकांना इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक वाहतूक यांचा संगम साधणारा हा उपक्रम परिसराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी भाजप नगरसेवक रुपेश सावरकर यांनी तरुणांनी रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे होण्याकडे भर द्यावा असे सांगितले
**‘EV Bike Rental and Sales’**च्या व्यावसायिकांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी रुपेश सावरकर यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.



