Uncategorized

महावितरण तांत्रिक लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांची भव्य द्वार सभा, कामाचे तास, सुरक्षा साधने, वाहन भात्यात वाढ, अशी मागणी

महावितरण तांत्रिक लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांची भव्य द्वार सभा, कामाचे तास, सुरक्षा साधने, वाहन भात्यात वाढ, अशी मागणी

छत्रपती संभाजीनगर महावितरण मंडळ कार्यालय येथे तांत्रिक लाईन स्टाफ कर्मचारी यांच्या प्रमुख नऊ संघटना मिळुन गेट मीटिंग घेण्यात आली. यावेळी तांत्रिक युनियनचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन,मनसे विज कामगार सेनेचे नारायण खरात, कामगार कर्मचारी अधिकारी सेनेचे सुनील बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर कैलास गौरकर, श्रावण कोहनुळकर, रफिक शेख, संजय शाहिर, प्रेम चव्हाण, अशोक कात्रे, विवेकानंद बांगर,थट्टेकर, मुंडे,बावणे, इनामदार, घायाळ, निकाळजे, राठोड,बनकर, चव्हाण आदी शेकडो कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मराठवाडा प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश खपले तसेच छत्रपती संभाजीनगर मुख्य अभियंता श्री डॉ.मुरहरी केळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

प्रमुख मागण्या
महावितरण मधील लाईनस्टॉप कर्मचा-यांना वर्ग ३ मध्ये वर्गीकरण करण्यात यावे. त्याकरीता यापुर्वी जे पदे रद्द करण्यात आली आहे. ती पदे पूर्ववत सुरू करण्यात यावे उदा. कारागीर अ ब क मिटर टेस्टर ग्रेड १/२/३ केबल जॉइंटर तारमार्ग निरिक्षक व तारमार्ग बांधकाम कार्यदेशक व इतर पदे.

२. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कर्मचारी यांचे कामाचे तास निश्चित करण्यात यावे.

३. महावितरण कंपनीतील लाइनस्टाफ कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप निश्चित करण्यात यावे.
४. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कर्मचारी यांना वाहतुक इंधन भत्ता २० लिटर देण्यात यावा.

५. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ यांना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी.
६. वसुली हे काम सांधिक स्वरूपाचे असल्याने जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

७. सरक्षित साधने व लाईन मेंटनन्स करीता योग्य ते साहीत्य पुरवण्यात यावे.

८. कंत्राटी पध्दतीने नोकरभती न करता सरळसेवा भर्तीने नोकर भर्ती करण्यात यावी. या व्यतीरिक्त प्रत्यक्ष चर्चेत लाईनस्टाफ च्या काही मुद्यावर / समस्यांवर निराकरण करण्यात पावे.

क्रमबद्ध आंदोलन रुपरेषा

१) दिनांक २५/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र भर सर्व परिमंडळ कार्यालय समोर प्रचंड मोठ्या द्वारसभा

२) दि ३०/१०/२०२३ पासून सिम बंद आंदोलन*

३) दि ६/११/२०२३ पासून वसुली बंद

४) दि. १६/११/२०२३ रोजी पासून वयक्तिक वाहन वापर बंद”

५) सर्व मोटार सायकल युनिट ला उभा करून त्यास काळे झेंडे लावणे)*

*६) दि २८/११/२०२३ ते ३०/११/२०२० पर्यन्त असहकार / कामबंद आंदोलन

७) १/१२/२०२३ आझाद मैदान येथे प्रचंड आक्रोश मोर्चा व १ दिवसीय धरणे आंदोलन*

८) १९/१२/२०२३ पासून बेमुदत आमरण उपोषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button