खासदार रविंद्र वायकर यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सोबत पोलिस अधिकारी यांची घेतली बैठक
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले सर्व तक्रारी सोडविण्याचे आश्वासन

*म्हाडा व पोलीस गृहनिर्माण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वसाहतींचा पुनर्विकास*
– गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली माहिती
– खासदार रविंद्र वायकर यांच्या लेखी निवेदनानंतर उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील गृह खात्याशी निगडीत प्रश्नाबाबत आयोजित करण्यात आली बैठक
– काल बाह्य गाड्या स्क्रॅप करण्यासाठी परिवहन विभागातर्फे स्क्रॅपिंग वर्षभरात स्क्रॅपिंग सुविधा कार्यान्वित
*मुंबई :*
मुंबई शहर व उपनगरातील पोलीस वसाहतींची दुरावस्था झाली असून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी सुचना खासदार रविंद्र वायकर यांनी करताच, पोलीस गृहनिर्माण मंडळ व म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठकीत उपस्थिताना दिली.

२७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील गृह खात्याशी निगडीत प्रश्नान बाबत बैठक लावण्यात यावी असे पत्र खासदार रविंद्र वायकर यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना दिले होते. त्यानुसार आज एम.आय.डी.सी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त परमजीत दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मितेश गट्टे, सहायक पोलीस आयुक्त विविध पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मनीषा वायकर, माजी नगरसेवक सदानंद परब, एकनाथ हुंडारे, आत्माराम चाचे, कमलेश राय, सुभाष सावंत, अभिजित सावंत, प्रतिभा खोपडे, चंद्रावती मौर्या, वृंदा मोघे, ज्ञानेश्वर सावंत, वैभव भराडकर, दीपिका तावडे, मनीष नायर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी नितीन पगारे, संदेश लोणारे, म्हाडाचे अधिकारी अनिकेत मोझे आदी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

गृह निर्माण राज्यमंत्री असताना पोलिसांच्या वसाहतीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी याप्रश्नी सविस्तर चर्चा झाली असून या प्रश्नी धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे खासदार रविंद्र यांची बैठकीत स्पष्ट करताच, पोलिसांच्या जेवढ्या वसाहती आहेत त्या एकत्र करून त्यांचा विकास करण्यात येणार आहे. पोलीस गृहनिर्माण मंडळ व म्हाडा यांच्या मार्फत पोलीस वसाहतींचा पुर्नार्विकास करण्याचे निश्चित झाले असून याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली.
त्याचप्रमाणे जुनी पोलीस ठाणे जे मोडकळीस आले आहे (जसे आरे, मेघवाडी, जोगेश्वरी) तसेच अन्य पोलीस स्थानकाच्या दुरुस्तीचा अथवा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात यावा. गृह विभागाकडे निधी प्राप्त झाला असल्याने ही कामे करण्यात येतील. अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
काल बाह्य गाड्या रस्त्याच्या कुठेही ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो

ही समस्या दूर करण्यासाठी मुंबईत परिवहन विभागातर्फे स्क्रॅपिंग सुविधा तयार करण्यात येत असून, वर्षभरात याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी दिले. रस्त्यावरील अनधिकृत पार्किग, गॅरेजेस, फेरीवले, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे, अशा सुचना ही कदम यांनी संबंधित अधिकारी याना यावेळी दिल्या. मुंबईच्या तसेच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील तक्षशीला, आरे, दुर्गानगर, जोगेश्वरी व अंधेरी गुंफा, सात बंगला, कुरार आदी ज्या ज्या भागात ड्रग विक्री करण्यात येथे त्या सर्व ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळि दिल्या. वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक तेथे सीसी कॅमेरा बसवण्यात यावा. विविध ठिकाणावरील सिंग्नलवरील भिकारी व तृतीयपंथी यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, श्यामनगर येथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या पोलीस बीट चौकीचा म्हणावा तसा वापर करण्यात येत नसल्याने, या बीट चौकीवरील खोली महिला सक्षमी कारणासाठी वापरण्यात यावी अश्या मागण्याही वायकर यांनी या बैठकीत केल्या. या बीट चौकीवरील त्यांचा आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या या चौकीवरील त्यांचा नावाचा बोर्ड काढण्यात आल्याने वायकर यांनी नाराजी व्यक्त केली.

जोगेश्वरी व आरे भुयारी मार्गाच्या कामासाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी, गोरेगाव-(पूर्व) नेस्को सेंटर येथे प्रदर्शनावेळी येथे येणाऱ्या गाड्या रस्त्यावर उभ्या ठेवण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनधिकृत बार यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वायकर यांनी यावेळी केली.



